बंद

मतदारसंघ

गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ आणि विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभा संसदीय मतदार संघाचे नाव गडचिरोली-चिमूर आहे आणि त्याचे मुख्यालय गडचिरोली येथे आहे. या संसदीय मतदार संघात गडचिरोली, आरमोरी आणि गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी असे दोन विधानसभा मतदारसंघ, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व ब्रम्हपुरी, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे.

गडचिरोली जिल्ह्यात एकूण ३ विधान सभा क्षेत्रे आहेत. विधान सभा क्षेत्र निहाय पुरुष, स्त्रि मतदारांची संख्या व मतदान केंद्रांची माहिती खालील प्रमाणे आहे; (दिनांक 23.1.2024 नुसार );

अ. क्र. विधान सभा क्षेत्राचे नाव पुरुष मतदाराची संख्या स्त्रि मतदाराची संख्या तृतीय पंती मतदाराची संख्या एकूण मतदारांची संख्या मतदान केंद्राची संख्या
1 67-आरमोरी 129789 128691 2 258437 302
2 68-गडचिरोली 152248 148688 2 300938 354
3 69-अहेरी 123668 121058 6 244732 292
एकूण 405705 398437 10 804152 948