बंद

तहसील व महसूल मंडळ

गडचिरोली जिल्ह्यात ६ महसूल विभाग असून एकूण १२ तालुके आहेत. प्रत्येक महसूल उपविभागात दोन तालुके अंतर्भूत आहेत. तालुकानिहाय एकूण महसुली गावे व मंडळ कार्यालयांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. उपविभागाचे नाव विभागातील तालुके तालुकानिहाय एकूण गावे एकूण समाविष्ट मंडळ एकूण समाविष्ट साजे
गडचिरोली १. गडचिरोली १२८ २८
२. धानोरा २२८ ४७
चामोर्शी १. चामोर्शी २०४ ३६
२. मुलचेरा ६८ ११
देसाईगंज (वडसा) १. देसाईगंज ३९ १३
२. आरमोरी १०३ २०
कुरखेडा १.कुरखेडा १२८ २६
२. कोरची १३३< २२
अहेरी १. अहेरी १८४ ३६
२. सिरोंचा १४८ २३
एटापल्ली १. एटापल्ली १९७ ५७
२. भामरागड १२८ २८
एकूण एकूण तालुके – १२ १६८८ ५९ ३४७

जिल्ह्यातएकूण १६८८ राजस्व गावे असून ४५७ ग्राम पंचायती, १२ पंचायत समीती व एक जिल्हा परीषद आहे. जिल्ह्यात ९ नगर पंचायती (कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड) असून तीन नगरपालिका गडचिरोली, देसाईगंज (वडसा) व आरमोरी येथे आहेत.