बंद

जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाची माहिती

जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हाधीकारी कार्यालाय हे मुख्य कार्यालय असून जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावत असते. तसेच हे कार्यालय म्हणजे एकप्रकारे महाराष्ट्र शासनाचा कणा असल्याप्रमाणे आहे. या कार्यालायाव्दारे जिल्ह्याच्या विकासा संबंधाने सगळ्या प्रकारचे निर्णय घेणे, जिह्यातील कायदा व सुरक्षा राखणे, तसेच जिल्ह्याचे नियोजन, राजस्व, निवडणूक, सार्वजनिक अन्न धान्य पुरवठा, नैसर्गिक आपत्तीचे नियोजन इत्यादी विषयाच्या बाबतीत काम करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांना व इतर अधिका-यांना निर्णय घेण्याचे अधिकार शासनाने दिलेले आहेत व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी हे वरील नमुद कामे यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी मदत करीत असतात. याप्रकारे जिल्हाधिकारी कार्यालय काम करीत असते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी यांचे कडे असलेल्या विविध विषयापैकी काही विषयाच्या संबंधाने जबाबदारीने कामे पार पडून त्यांना सहाय्य करतात.
खालील नमुद तक्ता जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाग व त्या विभागाचे काम पाहणारे विभागप्रमुख यांची माहिती दर्शविते.

अ.क्र. विभागाचे नाव विभागाच्या प्रमुखाचे पदनाम
गृह निवासी उपजिल्हाधिकारी
आस्थापना निवासी उपजिल्हाधिकारी
करमणूक निवासी उपजिल्हाधिकारी
रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी (रोहयो)
संजय गांधी योजना तहसिलदार (संगायो)
निवडणूक उपजिल्हाधिकारी (निवडणूक)
जिल्हा पुरवठा कार्यालय जिल्हा पुरवठा अधिकारी
जमीन निवासी उपजिल्हाधिकारी
भूसंपादन जिल्हा भूसंपादन अधिकारी
१० जिल्हा नियोजन समीती जिल्हा नियोजन अधिकारी
११ खनिकर्म जिल्हा खनिकर्म अधिकारी
१२ लेखा व सामान्य शाखा निवासी उपजिल्हाधिकारी
१३ राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी
१४ आपत्ती व्यवस्थापन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
१५ उपविभागीय कार्यालय उपविभागीय अधिकारी
१६ तहसील कार्यालय तहसिलदार

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाच्या कार्यालय प्रमुखाची कामे व जबाबदारी

निवासी उपजिल्हाधिकारी

निवासी उपजिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह, आस्थापना, राजस्व, सामान्य, खनिकर्म, संजय गांधी ईत्यादी शाखेचे कामकाज पाहतात. निवासी उपजिल्हाधिकारी हे शाखेनिहाय खालीलप्रमाणे जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडतात;

गृह, आस्थापना, सामान्य शाखा
  • सामान्य प्रशासन व कर्मचारी आस्थापनाविषयक बाबी ( गट अ ते ड ).
  • जिल्हा निवड समितीच्या संबधाने पत्रव्यवहार
  • विभागीय चौकशी
  • दंडाधिकारी संबंधाने कार्यवाही
  • शस्त्र परवाना देणे व जमा करणे.
  • बाल मजूर, करारबध्द मजूर व कमीतकमी मजुरी संबंधात अधिनियमाची अंमलबजावणी करणे.
  • अनुसूचित जाती, जमाती व इतर दुर्बल घटकाचे अत्याचार प्रतिबंधक कायदाचे संबंधाने काम करणे.
  • अबकारी प्रतिबंध
  • नैसर्गिक आपत्ती, मदत व पुनर्वसन, दुष्काळ, पाणी टंचाई ईत्यादी संबधात कामे पाहणे.
  • पिक उत्पादन अंदाज अहवाल व पाहणी, कृषी मालाचे उत्पादन कार्यक्रमाची रूपरेखा करणे.
  • शासकीय कराची वसुली करणे.
  • जमाबंदी
  • लोकांच्या तक्रारीचे निरसन, महत्वाचे व अती महत्वाच्या व्यक्तीचे आदरातिथ्य व राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
  • मुद्रांक व नोंदणी अधिनियम ची अंलबजावणी करणे.
  • सर्व स्वातंत्र्य सैनिक व जिल्हा सैनिक कल्याण मंडळ संबंधाने काम करणे.
  • अंदाजपत्रक व आंतरिक लेखा परीक्षण
  • गौण खनिज
  • झाडे तोडण्यासाठी परवानगी देणे (महाराष्ट्र झाडे तोडणे कायदा)
  • शासकीय निवास स्थानाचे वितरण
  • महाराष्ट्र लोक सेवा आयोग/ पीएमटी / एसएससी मंडळाच्या परीक्षा संबंधात काम करणे
  • सभेचे आयोजन
  • राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र वितरण करणे
करमणूक शाखा
  • करमणूक कर जमा करणे संबंधाने कार्यवाही.
  • व्हीडीओ केंद्र, सिनेमा गृह सुरु करण्यासाठी परवानगी देणे.
  • सार्वजनिक गणेश उत्सव, दसरा, दिवाळी सणानिमित्त आयोजित कार्यक्रमांना परवानगी देणे.
  • दारूबंदी व अबकारी उत्पादन प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी करणे.

जिल्ह्यात मागील तीन वर्षात वसूल केलेल्या करमणूक कराची माहिती खालीलप्रमाणे

अ.क्र. वर्ष लक्ष्य (रु.लाखात) साध्य साध्य टक्क्यामध्ये (%) करमुक्त (रुपयात)
1 2015-2016 120.00 96.51 80.42%
2 2016-2017 100.00 91.36 91.36%
3 2017-2018 27.86

संजय गांधी योजना शाखा

  • संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.

जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजने अंतर्गत उपलब्ध असलेल्या लाभार्थींची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अनु क्र पुरस्कृत योजनेचे नाव भौतिक उद्दिष्ट वर्षाकरिता 2022-2023 प्राप्त निधी वर्षाकरिता 2022-2023 ते 31.3.2023(रु. लाखात) निधीचे वितरण वर्षाकरिता 2022-2023 ते 31.3.2023(रु. लाखात ) निधीचे खर्च वर्षाकरिता 2022-2023 ते 31.3.2023(रु. लाखात ) उद्दिष्ट वर्षाकरिता 2022-2023( लाभार्थीची संख्या ) टक्केवारी खर्च झालेला निधी (रु. लाखात)
1 भारत सरकार राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना 0 67600.000 67600.000 7018.700 37455 10.38
राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजना 0 10000.000 10000.000 2420.000 409 24.2
राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना 0 7000.000 7000.000 58.800 3331 0.84
राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना 0 1100.000 1100.000 310.800 514 28.25
2 महाराष्ट्र शासन संजय गांधी निराधार योजना ( सर्वसाधारण ) 0 186528.400 186528.400 168609.600 14057 90.39
संजय गांधी निराधार योजना (अनु. जाती ) 0 49445.200 49445.200 47980.600 4165 97.03
संजय गांधी निराधार योजना ( अनु.जमाती ) 0 88930.100 88930.100 86845.650 8515 97.65
श्रावण बाळ सेवा योजना ( सर्वसाधारण ) 0 415947.979 415947.979 398308.300 38265 95.76
श्रावण बाळ सेवा योजना (अनु. जाती ) 0 129146.285 129146.285 109666.200 10913 84.91
श्रावण बाळ सेवा योजना ( अनु.जमाती ) 0 264300.700 264300.700 238133.100 22201 90.09
Total 0 1159098.66 1159098.66 1059351.75 139825 61.95

उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना )

उपजिल्हाधिकारी (ऱोहयो) यांची खालीलप्रमाणे कामाची कर्तव्ये आहेत;

  • रोजगार हमी योजना, ग्रामीण भूमिहीन लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे ईत्यादी कार्यक्रमाची प्रभावीपणे करून देणे अंमलबजावणी करणे.
  • जवाहर रोजगार योजना, जवाहर विहीर, रोजगाराची हमी व रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या योजनांच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
  • विंधन विहिरी बांधकामाची अंमलबजावणी करणे.
  • कृषी उत्पादन कार्यक्रमाचे नियोजन करणे.

जिल्हा पुनर्वसन अधिकारी

जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना खालील प्रमाणे कामाची कर्तव्ये आहेत;

  • प्रकल्पबाधित लोकांचे पुनर्वसन करणे.
  • जमिनीचे सर्वेक्षण व जमाबंदी.
  • भूसुधार, आदिवासी जमातीच्या लोकांच्या जमिनीचे संरक्षण व हस्तांतरणास बंदी, सिलिंग कायदा इत्यादी कामाची अंमलबजावणी करणे.
  • ग्रामीण भागातील जमिनीचे व्यवस्थापन.
  • कृषी प्रयोजनाकरिता अतिक्रमित केलेल्या जमिनीचे वाटप.
  • झुडपी जंगल संबंधात कामे.
  • कोर्ट ऑफ वार्ड कायद्याची अंमलबजावणी करणे.
  • औद्योगिक विकास. जिल्हा उद्योग केंद्र संबंधाने कार्यवाही.
  • जमीन वाटप संबंधाने कार्यवाही – शासकीय कार्यालय व इतर महत्वाच्या प्रकल्पासाठी जमीन उपलब्द करून देणे व भूसुधार.
  • “अ” वर्गातील नगरपालिकेच्या हद्दीतील जमिनींना अकृषक करीता परवानगी देणे.
  • वक्फ बोर्ड कायदा

उप जिल्हा निवडणूक अधिकारी

उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांची खालीलप्रमाणे कामांची कर्तव्ये आहेत;

  • सार्वत्रिक निवडणूक संबंधाने कामे करणे. ( लोकसभा व विधान सभा निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे)
  • जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, नगर पालिका, सहकारी संस्था ईत्यादी करीता निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
  • पदवीधर शिक्षक मतदारसंघ करीता निवडणूक मतदार याद्या तयार करणे.
  • कृषी उत्पन्न बाजार समीती ची निवडणूक घेणे.
  • जिल्ह्यातील विशेष सहकारी संस्थाचे संबंधाने प्रशासकीय कार्यवाही करणे.

जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्राची माहिती

गडचिरोली जिल्ह्यात एकूण ३ विधान सभा क्षेत्रे आहेत. विधान सभा क्षेत्र निहाय पुरुष, स्त्रि मतदारांची संख्या व मतदान केंद्रांची माहिती खालील प्रमाणे आहे; (दिनांक 23.01.2024 नुसार );

अ. क्र. विधान सभा क्षेत्राचे नाव पुरुष मतदाराची संख्या स्त्रि मतदाराची संख्या तृतीय पंती मतदाराची संख्या एकूण मतदारांची संख्या मतदान केंद्राची संख्या
1 67-आरमोरी 129789 128691 2 258437 302
2 68-गडचिरोली 152248 148688 2 300938 354
3 69-अहेरी 123668 121058 6 244732 292
एकूण 405705 398437 10 804152 948

विशेष भूसंपादन अधिकारी

  • गावठाण विस्तार कार्यक्रम
  • ग्रामीण भागातील भूमिहीन व जमीन नसलेल्या लोकांना घरकुल या शासनाच्या योजने अंतर्गत घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे.
  • इतर शासकीय कार्यालयासाठी जमिनीचे अधिग्रहण करणे.
  • “क” वर्गातील नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या जमिनीचे नियोजन करणे.
  • शहरी व ग्रामीण भागातील अतिक्रमित केलेल्या जमिनीचे नियमितीकरण करणे.
  • नगर पालिका प्रशासन
  • सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, स्थनिक निधी ची अंमलबजावणी करणे.
  • पाणी पुरवठा व स्वच्छता.
  • भाडे तत्वावर जागा उपलब्ध करून देणे व त्यावर देखरेख. सहकारी सोसायटी व्यतिरिक्त इतर संस्थाचे निवडणूक विषयक कामकाज पाहणे.

जिल्हा नियोजन अधिकारी

  • जिल्हा वार्षिक आराखडा, विशेष कृती आराखडा तयार करणे.
  • २० कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
  • आमदार व खासदार निधी अंतर्गत स्थानिक विकास कार्यक्रम.
  • तालुका समन्वय समीती व आढावा बैठक आयोजित करणे.
  • विविध योजने द्वारे लोकांना कर्ज मिळवून देण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व इतर बँकासोबत जिल्हा स्तरीय आढावा बैठक आयोजित करणे. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचे सोबत समन्वय साधने.

गडचिरोली जिल्ह्याचा सन 2023-24 करीता जिल्हा वार्षिक आराखडा (रु.लाखात) खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. योजनेचे नाव सर्व साधारण योजना आदिवासी उपयोजना आदिवासी उपयोजना क्षेत्रा बाहेरील अनुसूचित जाती उपयोजना एकूण
1 कृषी व कृषी संलग्न सेवा 3202.51 1805.51 35.00 470.00 5513.02
2 ग्रामीण विकास 1700.00 2042.42 0.00 0.00 3742.42
3 सिंचाई व पुर नियंत्रण 1876.99 250.00 0.00 0.00 2126.99
4 उर्जा 1200.00 550.00 50.00 300.00 2100.00
5 औद्योगिक व खनिकर्म 92.00 1.30 0.00 12.00 105.30
6 वाहतूक व दळणवळण 1559.50 750.00 0.00 0.00 2309.50
7 सामान्य सेवा 2118.91 5185.94 125.81 0.00 7430.66
8 सामान्य आर्थिक सेवा 3400.59 698.59 0.00 0.00 4099.18
9 सामाजिक व सामुहिक सेवा 15664.00 6622.36 0.00 2692.00 24978.36
10 नाविन्यपूर्ण योजना व मूल्यमापन सनियंत्रण व डाटाएन्ट्री व इनोव्हेशन कॉन्सिल 1355.50 346.76 0.00 126.00 1828.26
11 जलयुक्त शिवार व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 1830.00 0.00 0.00 0.00 1830.00
एकूण 34000.00 18252.88 210.81 3600.00 56063.69

जिल्हा पुरवठा अधिकारी

जिल्हा पुरवठा अधिकारी हे जिल्ह्यामध्ये लोकांना आवश्यक अन्नधान्याचा पुरवठा किफायतीशीर भावामध्ये उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. जिल्ह्यात केरोसिन व पेट्रोल चा पुरवठा करणे ची जबाबदारी सुद्धा त्यांची आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंमलबजावणी करणे व त्याचेवर नियंत्रण ठेवणे याची सुद्धा जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची असते. जिल्हा पुरवठा अधिकारी यांची खालीलप्रकारे कर्तव्ये आहेत.

  • अन्न धान्य पुरवठा करणे व संबंधीत विषय.
  • कुटुंब नियोजन व आरोग्य कार्यक्रम राबविणे.
  • नव संजीवनी योजनेची अंमलबजावणी करणे.
  • सार्वजनिक वितरण प्रणाली ची अंमलबजावणी करणे.

जिल्ह्यात तालुक्यानिहाय उपलब्ध असलेले स्वस्त धान्य दुकान, विविध प्रकारचे राशन कार्ड धारक यांची संख्या खालीलप्रमाणे आहे. ( दि. 31.03.2023 रोजी)

अ. क्र. तालुक्याचे नाव एकूण मंजुर दुकानांची संख्या स्वयं सहायता बचत गट कडून सुरु असलेली दुकाने अंत्योदय(पिवळ्या) बीपीएल(पिवळ्या) एपीएल(केशरी) प्राधान्य कुटूंब लाभार्थी शुभ्र
1 गडचिरोली 108 17 9004 0 1090 17928 759
2 धानोरा 125 32 10799 0 398 4653 48
3 चामोर्शी 198 40 13078 0 1769 27754 504
4 मुलचेरा 64 18 5315 0 522 4860 104
5 देसाईगंज 64 8 4445 0 3627 12027 1439
6 आरमोरी 95 16 5861 0 1813 16601 238
7 कुरखेडा 98 20 11403 0 1280 6812 167
8 कोरची 56 18 4947 0 221 4225 87
9 अहेरी 120 17 12419 0 1549 8435 429
10 सिरोंचा 104 26 7864 0 2592 7184 156
11 एटापल्ली 115 34 9835 0 1271 3704 36
12 भामरागड 50 19 5700 0 226 2049 78
एकूण 1197 265 100670 0 16358 116232 4045

बिपील व अंत्योदय राशन कार्ड धारकामध्ये पिवळ्या राशन कार्ड धारकाची संख्या अंतर्भूत आहे.

जिल्हा खनिकर्म अधिकारी

  • गौण खनिज व संबधित विषयाचे अनुषंगाने काम पाहणे.
  • खनिज पट्ट्याचे परवाना देणे.

खनिकर्म विभागाने मागील चार वर्षात जमा केलेल्या कराची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. चालू वर्षात उद्दिष्ट (रु. लाखात ) साध्य (रु. लाखात) साध्य % मध्ये
1 2019-2020 4700.00 4745.19 100.01%
2 2020-2021 7050.00 2971.33 42.15%
3 2021-2022 7320.00 2243.4362 30.65%
4 2022-2023 4681.00 2474.17 52.86%

गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य गौण खनिज
गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यतः लोह, चुनाखडी, हिरे ईत्यादी महत्वाची खनिजे आढळतात. ही गौण खनिजे जिल्ह्याचा औद्योगिक पाया मजबुतीकरण व आर्थिक विकासाचे दृष्टीने महत्वाची ठरतात.
जिल्ह्यात, लोह खनिज हे मुख्यतः हे जिल्ह्याच्या सुरजागड व भामरागड भागात आढळतात. जिल्ह्यात चुनाखडी हे खनिज देवलमारी व काटेपल्ली या भागात तर हिरे वैरागड हया भागात आढळतात.

जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी

फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ, 513 केबी)