बंद

जिल्हा पुरवठा कार्यालय

जिल्हा पुरवठा अधिकारी हे जिल्ह्यामध्ये लोकांना आवश्यक अन्नधान्याचा पुरवठा किफायतीशीर भावामध्ये उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. जिल्ह्यात केरोसिन व पेट्रोल चा पुरवठा करणे ची जबाबदारी सुद्धा त्यांची आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंमलबजावणी करणे व त्याचेवर नियंत्रण ठेवणे याची सुद्धा जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची असते. जिल्हा पुरवठा अधिकारी यांची खालीलप्रकारे कर्तव्ये आहेत.

  • अन्न धान्य पुरवठा करणे व संबंधीत विषय.
  • कुटुंब नियोजन व आरोग्य कार्यक्रम राबविणे.
  • नव संजीवनी योजनेची अंमलबजावणी करणे.
  • सार्वजनिक वितरण प्रणाली ची अंमलबजावणी करणे.

जिल्ह्यात तालुक्यानिहाय उपलब्ध असलेले स्वस्त धान्य दुकान, विविध प्रकारचे राशन कार्ड धारक यांची संख्या खालीलप्रमाणे आहे. ( दि. 31.03.2022 रोजी)

अ. क्र. तालुक्याचे नाव एकूण मंजुर दुकानांची संख्या स्वयं सहायता बचत गट कडून सुरु असलेली दुकाने अंत्योदय(पिवळ्या) बीपीएल(पिवळ्या) एपीएल(केशरी) प्राधान्य कुटूंब लाभार्थी शुभ्र
1 गडचिरोली 108 17 8655 4861 1963 12280 1031
2 धानोरा 126 32 9647 1457 1850 3648 432
3 चामोर्शी 198 40 12904 9238 2602 16702 432
4 मुलचेरा 63 18 5298 1346 803 3203 308
5 वडसा 64 8 4481 3078 5543 6700 1736
6 आरमोरी 95 16 5721 7538 1499 8699 1070
7 कुरखेडा 98 20 11182 0 1837 6831 952
8 कोरची 56 18 4427 903 3840 1133 260
9 अहेरी 120 17 12253 0 5780 11589 1034
10 सिरोंचा 104 26 7891 3333 5708 3624 659
11 एटापल्ली 115 34 9972 778 1114 2872 280
12 भामरागड 49 19 5634 0 0 2077 239
एकूण 1196 265 98065 32532 32539 79358 8433

बिपील व अंत्योदय राशन कार्ड धारकामध्ये पिवळ्या राशन कार्ड धारकाची संख्या अंतर्भूत आहे.