मतदारसंघ

गडचिरोली जिल्ह्यात एक लोकसभा  मतदार संघ असून 3 विधान सभा क्षेत्रे आहेत.  लोकसभा क्षेत्राचे नाव गडचिरोली-चिमूर असून मुख्यालय गडचिरोली आहे. या लोकसभा मतदार संघात गडचिरोली जिल्ह्यातील 3 विधान सभा मतदार संघ अनुक्रमे गडचिरोली, आरमोरी व अहेरी;  चंद्रपूर जिल्ह्यातील  2 विधान सभा मतदार संघ अनुक्रमे चिमूर व ब्रम्हपुरी तसेच गोंदिया जिल्ह्यातील एक विधानसभा मतदार संघ अनुक्रमे आमगाव अंतर्भूत आहेत.

विधान सभा क्षेत्रनिहाय पुरुष, स्त्री मतदारांची संख्या व मतदान केंद्राची संख्या खालीलप्रमाणे आहे. (दि. 1/1/2017 नुसार)

अ.क्र. विधान सभा क्षेत्राचे नाव पुरुष मतदारांची संख्या स्त्री मतदारांची संख्या एकूण मतदारांची संख्या मतदान केंद्रांची संख्या
1 67-आरमोरी 118845 113598 232443 290
2 68-गडचिरोली 138800 131263 270063 328
3 69-अहेरी 110431 105406 215837 286
एकूण 368076 350267 718343 904