बंद

सिरोंचा येथील पुष्कर कुंभ मेळावा

श्रेणी धार्मिक

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे दर १२ वर्षांनी प्राणहिता नदीवर पुष्कर कुंभमेळा भरतो. पुष्कर कुंभ मेळाव्यात तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील लाखो भाविक सिरोंचा येथील प्राणहिता नदी घाटावर स्नान करतात आणि दर्शनासाठी कालेश्‍वरम येथील मंदिरात हजेरी लावतात. पुष्कर कुंभमेळा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना व विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते.

छायाचित्र दालन

  • पुष्कर कुंभमेळ्यात भाविकांची उपस्थिती.
  • पुष्कर कुंभ मेळाव्यात प्राणहिता नदीच्या घाटावर स्नान करताना भाविक
  • पुष्कर कुंभमेळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेली व्यवस्था.
  • पुष्कर कुंभमेळ्यात प्राणहिता नदीला दिवा अर्पण केलेले दृश्य.
  • पुष्कर कुंभमेळ्यातील एक संत.

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ नागपूर आहे जे 411 किमी अंतरावर आहे.

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्टेशन चंद्रपूर आहे.

रस्त्याने

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात सिरोंचा या शहराजवळ प्राणहिता नदीच्या काठी पुष्कर कुंभ मेळावा आयोजित केला जातो. हे ठिकाण गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून दक्षिणेकडे 231 किमी अंतरावर आहे. सिरोंचा येथील बसस्थानक पायी चालण्यायोग्य अंतरावर आहे.