बंद

वन वैभव आल्लापल्ली

वन वैभव आल्लापल्ली हे आल्लापली वन विभाग क्षेत्राअंतर्गत कंपार्टमेंट न. 76 मध्ये वसलेले आहे. सदर स्थळ आल्लापल्ली पासून १६ कि.मी. अंतरावर असून भामरागड ला जाणाऱ्या रस्त्यालगत आहे. हे कायमस्वरूपी संरक्षण प्लॉट आहे. हा भाग आल्लापल्ली क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जंगलातील विविध प्रकारच्या झाडांचा त्यांच्या नैसर्गिक स्थितीनुसार अभ्यास करण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. या प्लॉटचे क्षेत्र जवळपास 6 हेक्टर क्षेत्र आहे आणि या स्थळाची स्थापना सन 1953 साली झाली आहे. या वन वैभव मध्ये विविध प्रकारचे झाडे उदा. साग, येन, कुसुम, धावडा, तेंदू इत्यादी आढळतात. तसेच या क्षेत्रात विविध प्रकारचे औषधीयुक्त फुलझाडे उदा. गुंज, तरोटा, वंदा, गुळवेल आढळतात.

छायाचित्र दालन

  • वन वैभव आल्लापल्ली
  • वन वैभव मधील सागाचे झाड
  • वन वैभव मधील तलाव
  • वन वैभव मधील सागाचे झाड

कसे पोहोचाल?:

विमानाने

नागपुर येथिल विमानतळ 306 किमी अंतरावर आहे

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक चंद्रपूर आहे.

रस्त्याने

वन वैभव आल्लापल्ली हे आल्लापल्ली या शहरापासून 16 कि.मी. व गडचिरोली पासून 116 कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी अहेरी तालुक्यामधील आल्लापल्ली व जिल्ह्याचे ठिकाण गडचिरोली येथे बस सेवा आणि खाजगी वाहने उपलब्ध आहेत.