बंद

वडधम जीवाश्म पार्क

वडदम जीवाश्म पार्क हे महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील वडादम या गावाजवळ असरअल्ली मार्गावर वसलेले आहे. सदर ठिकाण दक्षिणेकडे गडचिरोली जिल्हा मुख्यालया पासून 189 कि.मी. अंतरावर स्थित आहे. सिरोंचा या तालुक्याच्या ठिकाणापासून 19 कि.मी. अंतरावर आहे.
हौशी पुरातत्त्वतज्ज्ञांच्या एका गटाने महाराष्ट्रातील विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी प्रभावित झालेल्या सिरोंचा तालुक्यामधील वडदम या गावाजवळ प्राचीन असलेल्या अवशेषांचा शोध लावला आहे, ज्याचा त्यांनी लाखो वर्षांपूर्वीचा दावा केला आहे आणि हे प्राचीन अवशेष डायनासोर या प्राण्याचे मानले जातात.सिरोचाचा देशातील पाच ठिकाणी समावेश आहे जेथे डायनासॉरचे जीवाश्म मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. 1959 मध्ये तेलंगाना राज्याच्या सीमेजवळ असलेलेया कोथापल्ली-पोचमपल्ली या गावात गोदावरीच्या खो-याजवळ एक पूर्ण वाढ झालेला डायनासॉरचा सापळा सापडला. तेव्हापासून, सदर जीवाश्म कोलकातामधील एका संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.

छायाचित्र दालन

  • वडधम जीवाश्म पार्क
  • वडधम जीवाश्म पार्क चे प्रवेशद्वार
  • पार्कमधील संरक्षित जीवाश्म
  • वडधम पार्क मधील जीवाश्म
  • पार्कमधील जीवाश्म
  • वडधम जीवाश्म पार्क

कसे पोहोचाल?:

विमानाने

नागपुर येथिल विमानतळ 380 किमी अंतरावर आहे

रेल्वेने

जवळचे रेल्वेस्टेशन चंद्रपूर येथे आहे.

रस्त्याने

वडदम जीवाश्म पार्क हे महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील वडादम या गावाजवळ असरअल्ली मार्गावर वसलेले आहे. सदर ठिकाण दक्षिणेकडे गडचिरोली जिल्हा मुख्यालया पासून 189 कि.मी. अंतरावर स्थित आहे. सिरोंचा या तालुक्याच्या ठिकाणापासून 19 कि.मी. अंतरावर आहे. येथे जाण्याकरिता सिरोंचा या तालुक्याच्या ठिकाणावरून राज्य परिवहन महामंडळ ची व खाजगी बससेवा उपलब्द आहे.