बंद

लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा

लोकबिरादरी प्रकल्प (एलबीपी) हे महाराष्ट्र सेवा समिती, वरोरा जि. चंद्रपूर द्वारे एक सामाजिक उपक्रम म्हणून राबविल्या जात आहे. या प्रकल्पा अंतर्गत रुग्णालय, शाळा व पशु अनाथालय चालविल्या जाते. 23 डिसेंबर 1973 रोजी सामाजिक कार्यकर्ते मा. बाबा आमटे यांनी माडिया गोंड यांच्या एकात्मिक विकासासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे प्रकल्पाचे कार्य सुरु केले. सदर प्रकल्प गडचिरोली जिल्हा मुख्यालय पासून 160 कि.मी. अंतरावर आहे व आल्लापल्ली पासून 60 कि.मी. दूरवर आहे.

डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे या मेडिकल डायरेक्टर व मेडिकल ऑफिसर म्हणून येथे काम करतात व परिसरातील लोकांना आरोग्य, शैक्षणिक सुविधा उपलब्द करून दिल्या आहेत. त्यांना कम्युनिटी लीडरशिपसाठी 2008 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

छायाचित्र दालन

  • लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा चे प्रवेशद्वार
  • प्रकल्पाबाबत माहिती दर्शक तक्ता
  • लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथील दवाखाना
  • लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथील शाळा
  • डॉ. प्रकाश आमटे यांनी रुग्णांवर उपचार करताना
  • डॉ. प्रकाश आमटे आपल्या कुटुंबासह

कसे पोहोचाल?:

विमानाने

नागपुर येथिल विमानतळ 350 किमी अंतरावर आहे

रेल्वेने

जवळचे रेल्वेस्टेशन चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे आहे.

रस्त्याने

लोक बिरादरी प्रकल्प हे गडचिरोली जिल्हा मुख्यालय पासून 160 कि.मी. अंतरावर आहे व आल्लापल्ली पासून 60 कि.मी. दूरवर आहे. येथे जाण्याकरिता आल्लापली येथे महाराष्ट्र राज्य वाहतूक महामंडळ कडून बससेवा तसेच खाजगी वाहन सुद्धा उपलब्द आहेत.