बंद

चपराळा वन्यजीव अभयारण्य

चपराळा वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यात स्थित आहे. या अभयारण्याचे क्षेत्र 140 कि.मी. पर्यंत पसरलेले आहे. यामध्ये घनदाट जंगल असून भरपूर प्रमाणात गवत सुद्धा आढळतो. या अभयारण्याचा भाग उत्तर-पूर्वेस आणि दक्षिणेकडून मार्कंडा व पेडीगुडम डोंगराळ प्रदेशाने वेढलेला आहे आणि प्रणिता नदी त्याच्या पश्चिम सीमेवर वाहते. अभयारण्य वर्धा व वैनगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. पावसाळयात या नद्यांचे पाणी नाल्यांच्या माध्यमातून अभयारण्य मध्ये प्रवेश करते. यामुळे अभयारण्यामध्ये नदींच्या परतीच्या पाण्याने मासे, झिंगे व कासव इत्यादी प्रवेश करतात. अभयारण्याच्या पर्यावरणामुळे परतीच्या पाण्याने फेकल्या गेलेल्या मासे, झिंगे व कासव यांचे पोषण होते. ते श्रीमंत
जलीय जीवनासंबंधात तसेच नैसर्गिक सौंदर्यासाठी उपयुक्त आहेत.अभयारण्य मध्ये संपन्न फुलांचा विविधता आहे. येथील जंगलाची विशेषता म्हणजे येथे झुडपी जंगल असून बहुतांश भाग गवत, विविध प्रकारची मोठी झाडे, वृक्षे, मोह व सागाची झाडे, वेली, औषधी वनस्पती, विविध रंगाची फुलझाडे इत्यादी प्रजाती आढळतात.
अभयारण्यात वन्यजीव सुद्धा आढळतात. अभयारण्यमध्ये वाघ, चित्ता, जंगली मांजरी, अस्वल, जंगली कुत्री, हिरण, सांबार आणि इतर अनेक प्राणी आढळतात.अभयारण्य मुख्य वनसंरक्षक व वन आणि क्षेत्रीय संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प यांच्या नियंत्रणाखाली येते.उद्यानास भेट देण्याचा सर्वोत्तम काळ फेब्रुवारी ते मे महिन्यात असतो.

छायाचित्र दालन

  • चपराळा वन्यजीव अभयारण्यमध्ये जाण्याचा रस्ता
  • चपराळा वन्यजीव अभयारण्यमधील नदीचे दृश्य
  • चपराळा जंगलातील कोल्हा
  • चपराळा जंगलातील सांबर प्राणी
  • चपराळा जंगलात आढळणारे पक्षी
  • चपराळा जंगलातील वाघ

कसे पोहोचाल?:

विमानाने

नागपुर येथिल विमानतळ 230 किमी अंतरावर आहे.

रेल्वेने

जवळचे रेल्वेस्टेशन चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथे आहे.

रस्त्याने

चपराळा गाव चपराळा वन्यजीव अभयारण्य मध्ये स्थित आहे. सदर अभयारण्य गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 44 कि.मी. अंतरावर आहे व चामोर्शी पासून 14 कि.मी. दूरवर आहे. सदर भाग गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यात मोडतो. येथे भेट देण्यासाठी चामोर्शी येथे राज्य परिवहन महामंडळाची बससेवा आणि खाजगी वाहने उपलब्ध आहेत.