बंद

पोलीस

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभाग जबाबदार आहे. प्रशासकीय दृष्टीकोनातून जिल्ह्यात पोलीस दलाचे गडचिरोली, कुरखेडा, धनोरा, घोट, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली आणि एटापल्ली असे एकूण आठ पोलीस उपविभाग कार्यरत आहे. जिल्ह्यात एकूण 14 पोलीस ठाणे, 14 उप पोलीस ठाणे व 14 सशस्त्र आउट पोस्ट आहेत. 14 पोलिस स्थानके, 14 उप पोलीस ठाणी व 14 पोलीस ठाण्यांचे 8 पोलीस उपविभाग आहेत,. जिल्ह्यात एकूण 3087 (अंदाजे) पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.

पीपल्स वॉर ग्रुप (पीडब्ल्यूजी) च्या नक्षलवादासह जिल्ह्यात अत्यंत तीव्रपणे प्राणघातक हल्ले केले जातात. जिल्ह्यात घनदाट जंगल व डोंगराळ भाग असल्याने नक्षलवादी कार्यवाही जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागामध्ये चालतात.

जिल्ह्याचे दक्षिणेकडील भाग मुख्यतः सिरोंचा, अहेरी, एटापल्ली आणि भामरागड या नक्षलग्रस्त आहेत. कारण या भागामध्ये घनदाट जंगल आहे आणि मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगढ राज्याच्या सिमा जिल्ह्याला लागून आहेत.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यात नक्षलवाद्यांना दूर ठेवण्यासाठी पोलीस कर्मचा-यांना खूप त्रास सहन करावा लागला आणि त्यांचेकडून जिल्ह्यात एक महत्त्वाची भूमिका बजावली जाते. याशिवाय जिल्हा पोलिसांनी जनजागृती मेळावा सारख्या अनेक चांगल्या योजनाही सुरू केल्या आहेत ज्यामध्ये आदिवासींना आमंत्रित करून त्यांना विविध सरकारी योजनाचा परिचय करून देण्यात येतो व त्यांचेकडून लाभ मिळवून दिल्या जाते.

गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक:- श्री. निलोत्पल , आयपीएस