जंगलातील आग
जंगलातील आग/ वनवा- सामान्य खबरदारी
प्रतिबंध व पूर्वतयारी:
-
जिल्हा अग्निशमन विभाग (१०१) व स्थानिक वन अधिकाऱ्यांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक जवळ ठेवा.
-
कोणतीही आग बेवारस किंवा नियंत्रणाबाहेर दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित अधिकाऱ्यांना कळवा.
-
जंगलाजवळ आगी लावून पूर्णपणे न विझवता तशीच सोडून जाऊ नका. आग पूर्णपणे विझवा आणि राख थंड झाली आहे का हे खात्री करा.
-
जंगलात कॅम्पिंग दरम्यान, लालटेन, स्टोव्ह आणि हीटर वापरताना खबरदारी घ्या. रिफ्यूल करण्यापूर्वी उपकरणे थंड झाली आहेत याची खात्री करा.
ज्वलनशील द्रव्यांचा अपघात टाळा व त्यांना दूर सुरक्षित ठिकाणी ठेवा. -
जंगलातून जाताना सिगारेट, काडेपेटी फेकू नका.
-
जंगलाजवळ शेतातील कचरा, पालापाचोळा व इतर कचरा जाळू नका.
-
जंगलाजवळच्या शेतांमध्ये कचरा जाळू नका.
-
दूरस्थ व जंगलातील आगप्रवण भागातील लोकांनी आपत्ती दरम्यान बाहेर पडण्याचे मार्ग माहित करून घ्यावेत आणि आपत्कालीन साहित्य तयार ठेवावे.
-
नियमितपणे स्थानिक वन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने वनव्यापासून सुरक्षित राहण्यासाठीच्या आवश्यक कृतींचा सराव करा.
-
आग लागल्यावर एकत्र जमा होण्याचे सुरक्षित ठिकाण आधीच निश्चित करून ठेवावे व कुटुंबीयांना त्याची माहिती असावी.
जंगलात आग लागल्यास स्थानांतर:
-
स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार लगेचच सुरक्षित स्थळी स्थानांतर करा.
-
स्थानांतर करताना आजूबाजूच्या उडणाऱ्या ठिणग्यांपासून व राखेपासून संरक्षणासाठी योग्य काळजी घ्या.
-
जनावरांना बांधून न ठेवता त्यांना मोकळे सोडा.
घर सोडण्याआधी:
-
घराच्या आसपासचे लाकूड, शेतीकचरा, गॅस सिलेंडर, इंधनाच्या कॅनसारखी ज्वलनशील वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवा.
-
खिडक्या व दरवाजे बंद करा.
-
मोठ्या भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवा. याचा उपयोग आग विझवण्यासाठी होऊ शकतो.
-
वनवाची आग घरापर्यंत येऊ नये यासाठी झुडपे व कुंपण तोडा, जेणेकरून घर आगीपासून वेगळं राहील.
-
गटार, छप्पर यावरून वाळलेली पाने हटवा आणि पाणी फवारून ओलसर करा.
-
घरातील पडदे किंवा इतर ज्वलनशील गोष्टी बंद करा.
-
स्थानिक वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि जंगल आगीबाबत सतर्क राहा.
घराबाहेर खुल्या जंगलात आगीत अडकल्यास:
-
आगीपासून पळू नका. तळ्याजवळ किंवा नदीसारख्या स्थिर जलाशयात आसरा घ्या.
-
पाण्याचा स्रोत नसेल, तर कमी वनस्पती असलेल्या खोल भागात जा, जमिनीवर झोपा आणि अंगावर ओला कपडा, ब्लँकेट किंवा माती टाका.
-
धूर टाळण्यासाठी ओल्या कपड्याने नाक आणि तोंड झाका.
-
आग वाढवणारा इंधनाचा स्त्रोत नसलेली जागा आश्रय घेण्यासाठी निवडा.
घरात अडकले असल्यास:
-
शांत राहा. आग पुढे सरकत असल्यास घरात मागे सरा. आग घर जळण्याआधी पुढे निघून जाण्याची शक्यता असते. तरी सतर्क रहा. दुर्लक्ष करू नका.
-
दरवाजा गरम वाटत असल्यास उघडू नका. दुसऱ्या बाजूला आग असू शकते.
गाडीमध्ये अडकल्यास:
-
बाहेर पळण्यापेक्षा गाडीतच सुरक्षित रहा.
-
खिडक्या व एअर वेंट्स बंद ठेवा.
-
लाईट सुरू करून सावकाश गाडी चालवा.
-
इतर वाहनं व लोक यांची काळजीपूर्वक निरीक्षण करा.
-
पुढे काय आहे हे दिसत नसेल तर धुरात चालवू नका. धुरात गाडी चालवण्याचा धोका पत्करू नका.
गाडी थांबवावी लागल्यास:
-
झाडांपासून दूर गाडी लावा..
-
लाईट सुरू व इंजिन बंद ठेवा.
-
अंगावर ज्वलनशील नसलेले काही तरी झाकून जमिनीलगत सुरक्षित राहा.
-
धूर व ठिणग्या आल्या तरी गोंधळून जाऊ नका, कारण इंधन टाकी सहसा फुटत नाहीत.
नेहमी लक्षात ठेवा:
-
दाट झाडांजवळ धूम्रपान करू नका. सिगारेट/बिडी जळत्या स्थितीत फेकू नका.
-
जंगलात लावलेली आग वापरल्यानंतर ती पूर्ण विझवा.
-
कोरड्या वनस्पतींच्या भागात वीज पडल्याने आग लागू शकते, अशा वेळी कुंपण तयार करा किंवा वन अधिकाऱ्यांना कळवा.
-
शक्य असल्यास फावड्याने खणून किंवा पाणी ओतून आग विझवा. नाही शक्य असल्यास अग्निशमन दलाला कॉल करा.
-
शेतातील जनावरं व इतर हलवता येणाऱ्या वस्तू सुरक्षित स्थळी हलवा.
-
आगीच्या वेळी रेडिओ/टीव्ही/संदेशांद्वारे सतत माहिती घ्या आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळा.
-
कुटुंबीय, मित्र व इतरांना आगीची कारणं आणि धोके समजवा. जंगल आगीसंबंधी जनजागृती करा.
-
जंगलात अचानक आग लागल्यास घाबरू नका, धीर ठेवा आणि इतरांनाही आधार द्या.
-
जळते लाकडं झाडाझुडपात सोडून जाऊ नका.
-
जंगलात आग लागलेली असताना वेळी जंगलात जाऊ नका.
-
आपल्या परिसरात पिकाचे पाचट झाकून नवीन पीक घेण्याच्या पद्धतीच्या (slash & burn) वापर न करण्यासाठी लोकांना जागरूक करा. ही पद्धत कार्बन डाएऑक्साईड वाढवून आरोग्यावरही परिणाम करते.