कसे पोहोचाल?
गडचिरोली शहर हे विदर्भामधील नागपूर व चंद्रपूर शहरापासून अनुक्रमे १८० कि.मी. व ८० कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गडचिरोली जिल्हा रस्ते मार्गाने सीमा बाजूला असलेले भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्याशी चांगल्याप्रकारे जोडले गेले आहे. नागपूर येथून बस द्वारे रस्ते मार्गाने गडचिरोली येथे पोहचण्याकरिता जवळपास अनुक्रमे चार तास लागतात तर चंद्रपूर वरून दोन तास. नागपूर व चंद्रपूर येथे जाण्याकरिता गडचिरोली वरून भरपूर प्रमाणात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस व खाजगी वाहण व्यवस्था उपलब्ध आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकच १८.४८ कि.मी. चा रेल्वे मार्ग आहे. गडचिरोली शहर हे रेल्वेने जोडलेले नसून जिल्ह्यातील देसाईगंज या शहरात रेल्वे स्टेशन आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील परिवहन संबंधात खालील प्रमाणे माहिती उपलब्ध आहे.
दळणवळणाची साधने | संख्या |
---|---|
जिल्ह्या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग | १ |
जिल्ह्या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग ची लांबी कि.मी. मध्ये | ५० |
राज्य महामार्ग कि.मी. मध्ये | १२२० |
इतर जिल्हा मार्ग कि.मी. मध्ये | १३७८ |
ग्राम रस्ते कि.मी. मध्ये | ३८३४.८०० |
नदीवरील एकूण पुलांची संख्या | २४४ |
एकूण बस आगार | २ ( गडचिरोली, अहेरी ) |
रा. पं. महामंडळ व्दारे एकूण जोडले गेलेले गाव | २७१ |
एकूण रेल्वे रस्ता कि.मी. मध्ये | १८.४८ |
अस्तित्वात एकूण रेल्वे पूल | |
एकूण निर्मनुष्य रेल्वे क्रसिंग | २ |
एकूण रेल्वे स्टेशन | १ (वडसा – देसाईगंज ) |
एकूण विमानतळ | — |
जिल्ह्यातील एकूण पोस्ट कार्यालय | २४ |