वादळ
चक्रीवादळ / वादळ / सोसाट्याचे वारे- सामान्य खबरदारी
चक्रीवादळ / वादळ / सोसाट्याचे वारे सुरू होण्यापूर्वी:
-
वादळाच्या हंगामापूर्वी घराची नीट तपासणी करा. दरवाजे, खिडक्या दुरुस्त करा आणि सैल झालेल्या तसेच छताची कौलांची योग्य काळजी घ्या.
धारदार वस्तू उघड्या व मोकळ्यात ठेवू नका. -
स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन घराजवळील वाळलेले किंवा पडणाऱ्या अवस्थेतील झाडांची छाटणी करा.
-
लाकडी ओंडके, लोखंडी पत्रे, पुट्ठे, कचऱ्याची डबे, फलक इत्यादी उडू शकणाऱ्या वस्तू योग्य प्रकारे सुरक्षित ठिकाणी ठेवा.
-
काचांच्या खिडक्यांवर लावण्यासाठी लाकडी पट्ट्या तयार ठेवा.
-
विजेचा पुरवठा खंडित झाल्यास बॅटरीवर चालणाऱ्या टॉर्च व कोरड्या बॅटऱ्या तयार ठेवा.
-
धोकादायक इमारती पाडून टाका आणि अशा इमारतींमध्ये राहू नका.
-
महत्त्वाची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू खराब अथवा ओल्या होणार नाही अश्या पद्धतीने सुरक्षित ठेवा.
-
सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक वस्तूंची आपत्ती किट तयार ठेवा.
-
कोरडा व टिकाऊ अन्नसाठा तयार ठेवा. पिण्याचे पाणी झाकण असलेल्या भांड्यांत साठवून ठेवा.
-
आपत्कालीन दिवे, टॉर्च कार्यरत आहेत का ते तपासा आणि हाताशी ठेवा.
-
घराजवळील उघड्यावर असणाऱ्या व उंच वस्तू सुरक्षित ठेवा.
-
विशेष आहाराची आवश्यकता असणाऱ्या व्यक्ती, लहान मुले, वृद्ध यांच्यासाठी औषधे व अन्नाची व्यवस्था करा.
-
सोसाट्याचे वारे सुरू होण्यापूर्वी विजेचा मुख्य स्विच बंद करा.
-
मोबाईल चार्ज करून ठेवा व आपत्कालीन संवादासाठी SMS वापरा.
-
हवामानाबाबत रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्राद्वारे माहिती मिळवत रहा.
चक्रीवादळ / वादळ / सोसाट्याचे वारे सुरू असताना:
-
सतत हवामानाची स्थिती आणि प्रशासनाद्वारे दिले जाणारे इशारे तपासत रहा.
-
शांत राहा. केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पसरवूही नका.
-
जर तुमचे घर मजबूत असेल, तर सुरक्षित भागात थांबा. परंतु, प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना केल्यास तात्काळ स्थानांतर करा.
-
विजेचा मुख्य स्विच बंद करा. घर आणि इमारतीतील सर्व उपकरणे व गॅस बंद करा.
-
थोड्याच वेळात वादळ शांत झाले आहे असे वाटले तरीही बाहेर पडू नका; ते पुन्हा वेगाने येऊ शकतात.
-
काचेच्या खिडक्यांना बोर्ड लावा किंवा शटर लावा. बाहेरील दरवाज्यांना मजबूत आधार द्या.
-
स्थलांतर करताना आवश्यक कागदपत्रे, औषधे, आवश्यक खाद्य सोबत घ्या.
-
आपली मालमत्ता व वस्तू परत घेण्यासाठी जाऊ नका व सुरक्षित स्थळी जा.
-
निवाऱ्यात प्रभारी अधिकाऱ्यांचे निर्देश पाळा आणि परवानगी मिळेपर्यंत तेथून हलू नका.
-
जनावरे मोकळे सोडा, बांधू नका.
-
जर तुम्ही बाहेर असाल, तर झाडा/विद्युत खांबाखाली थांबू नका. सुरक्षित ठिकाणी आसरा शोधा.
वादळानंतर काय करावे:
-
घर परिसरातील कचरा साफ करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा.
-
तुटलेले विद्युत खांब, सैल वायर, धारदार वस्तू यापासून दूर रहा.
-
वाहन चालवताना काळजीपूर्वक आणि हळू चालवा.
-
खराब झालेली उपकरणे वापरण्याआधी इलेक्ट्रिशियनकडून तपासून घ्या.
-
प्रशासनाला नुकसानाची खरी माहिती द्या, खोटी माहिती देऊ नका.
मच्छिमारांसाठी:
-
हवामान इशाऱ्यांसाठी रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्र तपासत राहा.
-
वादळाचा इशारा दिल्यास, जलाशय किंवा नदीत मासेमारी करू नका. बोटींना सुरक्षित ठिकाणी बांधा.
-
वादळ सुरू असताना जर पाण्यामध्ये असाल, तर घाबरू नका. शांत राहून नदीकिनारी किंवा सुरक्षित ठिकाणी जा.
-
मासेमारीसाठी जाताना लाईफ जॅकेट नेहमी सोबत ठेवा.