• साइट मॅप
  • Accessibility Links
बंद

राज्यस्तरीय सेवा पंधरवडा कार्यक्रम (सेवा पंधरवडा)

सेवा पंधरवडा 2025


सेवा पंधरवडा २०२५

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा-17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत विशेष मोहीम

सर्व नागरीकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. मराअ-2025/प्र.क्र.63(ई ऑफीस क्र. 1296378) समन्वय-1 दिनांक 01 सप्टेंबर, 2025 अन्वये, महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याचे दृष्टीकोनातून भारताचे पंतप्रधान राष्ट्रनेता मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा आगामी जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 02 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत “सेवा पंधरवाडा ” राबविण्याकरिता दिनांक 01 सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

हे अभियान “पाणंद रस्ते विषयक मोहिम”, “सर्वांसाठी घरे” या उपक्रमासाठी पुरक उपक्रम आणि “जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नाविन्यपुर्ण उपक्रम” अशा तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

सेवा पंधरवाडा अभियानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये शिव/ पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, ज्या रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक, वाजिब उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्याची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी संमतीपत्र घेणे, रस्ता अदालत आयोजित करुन शेतरस्त्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांची मोजणी व सिमांकन करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दिनांक 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालावधीमध्ये “सर्वांसाठी घरे” या उपक्रमाअंतर्गत घरे बांधण्यासाठी निर्बाध्यरित्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करणे, सदर उपक्रमासाठी रहिवासी प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करणे, सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत शासकीय जमीन वाटप केलेल्या तसेच अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या लाभार्थ्यांना पट्टे वाटप करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये दिनांक 28 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर या कालावधीमध्ये जालना जिल्ह्याकरीता “जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नाविन्यपुर्ण उपक्रम” राबविण्यात येणार आहेत.

सदर अभियान यशस्वी करण्यासाठी यंत्रणेतील प्रत्येक घटक प्रयत्नशील राहणार असून गडचिरोलीजिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

News story 2 photo
News story 3 photo


Feature news story photo
News story 4 photo

सेवा पंधरवाड्यासाठीचा जीआर

अ. क्र. जीआर शीर्षक PDF
1 सेवा पंधरवाडा सेवा पंधरवाडा 2025 GR डाउनलोड करा
2 सर्वांसाठी घर सर्वांसाठी घर जीआर 2025 डाउनलोड करा
3 रस्ते पांडन रास्ते जीआर डाउनलोड करा

ध्वनिचित्रफीत दालन
  • WhatsApp Image 2025-09-20 at 5.30.22 PM
  • WhatsApp Image 2025-09-20 at 5.40.11 PM
  • WhatsApp Image 2025-09-20 at 6.45.26 PM
  • WhatsApp Image 2025-09-20 at 6.45.25 PM
  • WhatsApp Image 2025-09-20 at 5.32.24 PM
  • WhatsApp Image 2025-09-20 at 5.31.26 PM
  • WhatsApp Image 2025-09-20 at 5.37.48 PM