भूकंप
भूकंप- सामान्य खबरदारी
सर्वसाधारण परिस्थितीत:
-
आपल्या आजूबाजूला सुरक्षित जागा ओळखून ठेवा-
-
मजबूत टेबल, पलंगाखाली
-
आतील भिंतीजवळ
-
काच, आरसे, फोटो फ्रेम्स, जड फर्निचरपासून दूर
-
उघड्या जागा- इमारती, झाडे, वायर, पूल यांपासून दूर
-
आपत्कालीन नंबर (डॉक्टर, रुग्णालय, पोलिस) लक्षात ठेवा. First Aid व Drop-Cover-Hold तंत्र शिकून ठेवा.
-
आपत्तीदरम्यान कुटुंबातील सदस्य एकमेकांपासून वेगळे होण्याची शक्यता असते. त्यामुळे यासंबंधित पूर्व नियोजन करा.
-
सरकारी यंत्रणा तसेच संस्थांनी आयोजित केलेल्या ड्रील्स, प्रशिक्षणात भाग घ्या.
भूकंपरोधक बांधकामासाठी सूचना:
-
बांधकाम करताना संरचनात्मक अभियंत्याचा सल्ला घ्या. Bureau of Indian Standards (BIS) यांनी दिलेले कोड्स पाळा.
-
पुरप्रवण क्षेत्र व खोलगट जागांवर घर बांधू नका.
-
घराची आराखडे व डिझाइन व्यवस्थित सांभाळून ठेवा.
-
घर अथवा इमारतीत संरचनात्मक दोष दिसल्यास तत्काळ दुरुस्ती करा.
-
जड वस्तू खालच्या शेल्फवर ठेवा. शेल्फ भिंतीला घट्ट बांधा. काचयुक्त वस्तू बंद कपाटात ठेवा.
-
विजेच्या वायरिंग व गॅस लिकेज नियमित तपासा.
-
पंखे, दिवे, गीझर इ. सुरक्षित बांधा. एखादा आघात होऊन ते पडणार नाही याची काळजी घ्या.
भूकंपावेळी काय करावे:
-
अनेकदा प्राथमिक धक्क्यानंतर मोठा धक्का येतो, त्यामुळे हालचाल कमी ठेवा आणि सुरक्षित जागी थांबा.
-
मुलं, वृद्ध, दिव्यांग यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवा.
-
प्राणी बांधू नका. त्यांना मोकळे सोडा.
घरात असताना
-
खाली बसा (DROP), टेबलखाली/मजबूत फर्निचरखाली लपून झाकण घ्या (COVER), घट्ट धरून ठेवा (HOLD).
-
खिडक्या, काच, फर्निचर, लाइट्सपासून दूर रहा.
-
पलंगावर असाल, तर उशी डोक्यावर ठेवून सावध राहा, परंतु जर डोक्यावर जड वस्तू असतील, तर इतर सुरक्षित ठिकाणी जा.
-
भूकंप थांबेल तोपर्यंत घरातच रहा.
घराबाहेर असताना:
-
इमारती, झाडे, विजेच्या तारा यांपासून दूर रहा.
-
उघड्या जागेतच थांबा.
गाडीत असताना:
-
शक्य तितक्या लवकर गाडी थांबवा. इमारती, झाडे, पूल यांच्या जवळ थांबू नका.
-
भूकंप थांबल्यावर रस्ता, पूल यांचे नुकसान झाले असेल तर त्यावरून गाडी चालवू नका.
ढिगाऱ्याखाली अडकले असल्यास:
-
आगपेटीच्या आग पेटवू नका. हालचाल कमी करा.
-
नाकावर कपडा ठेवा.
-
तुम्ही ढिगाऱ्याखाली दाबले असल्याचा इशारा देण्यासाठी भिंतीवर/पाईपवर थाप द्या किंवा शिट्टी वाजवा.
-
अनावश्यक जोऱ्याने ओरडू नका. यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा वाचेल व श्वासावाटे धूळ तोंडात जाणार नाही.
भूकंपानंतर काय करावे:
-
भूकंपानंतर काय करावे:
-
नुकसानग्रस्त इमारतीत जाऊ नका.
-
लिफ्ट न वापरता जिन्याने जा.
-
आफ्टरशॉक्सची शक्यता लक्षात ठेवा.
-
इमारती, खांब, झाडे यांच्या सुरक्षिततेची खात्री झाल्याशिवाय जवळ जाऊ नका.
-
अफवा पसरवू नका. अधिकृत सूचना पाळा.
-
घर सोडताना कोठे जात आहात याची माहिती देऊन नोंदवून ठेवा अथवा कोणालातरी सांगून जा.
-
आपले घर व परिसरातील बचावकार्य करणाऱ्या वाहनांची ये जा करण्यासाठी मोकळे ठेवा.
-
पूल/फ्लायओव्हर वापरू नका. त्यावरून गाडी चालवू नका.