आपत्कालीन परिस्थितींसाठी पूर्वतयारी कशी करावी?
आपत्ती/आपत्कालीन परिस्थितींसाठी पूर्वतयारी कशी करावी?
-
आपल्या भागात कोणत्या प्रकारच्या आपत्ती येऊ शकतात हे जाणून घ्या.
-
प्रत्येक प्रकारच्या आपत्तीची तयारी कशी करावी हे शिका. आपत्तीची सूचना कशी मिळेल हे देखील जाणून घ्या.
-
आपल्या गावात/परिसरात आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित असू शकतील अश्या ठिकाणांची माहिती ठेवा.
-
आपल्या परिसरातील मुख्य आपत्ती लक्षात घेऊन घरगुती आपत्कालीन योजनेची आखणी करा.
-
कुटुंबीय व शेजाऱ्यांबरोबर आग, वादळ, भूकंप व इतर आपत्तींच्या धोक्यांवर चर्चा करा.
-
प्रत्येक आपत्तीप्रकारासाठी घरात व आजूबाजूला कोणती सुरक्षित स्थळे आहेत हे ठरवा.
-
आपत्कालीन परिस्थितीत पाणी, वीज व गॅसचे मुख्य नळ/स्विच बंद कसे करायचे हे सर्व कुटुंबीयांना शिकवा.
-
आपत्कालीन टेलिफोन क्रमांक सहज उपलब्ध ठेवा व ते सर्व कुटुंबीयांना पाठ असावेत.
-
मुलांना पोलीस (100), अग्निशमन दल (101), अँब्युलन्स (102), राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक (112) याबद्दल माहिती द्या आणि ते कधी व कसे कॉल करायचे हे शिकवा.
-
हवामान व आपत्कालीन माहिती मिळवण्यासाठी विश्वासार्ह सोशल मीडिया, अॅप्स, टीव्ही-रेडिओ स्टेशन यांचा वापर करा.
-
कुटुंबासाठी आपत्कालीन संपर्क योजना तयार करा. आपत्तीदरम्यान कुटुंबातील सदस्य एकमेकांपासून वेगळे होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वांनी एक ठिकाणी येण्यासाठी आधीच नियोजन करून ठेवा.
-
आपत्कालीन परिस्थितीत घरातून सहज आणि सुरक्षित बाहेर येण्यासाठी आधीच उपायोजना करून ठेवा.
-
दोन आपत्कालीन भेटण्याची ठिकाणे आधीच निश्चित करा व स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेली सुरक्षित निवाऱ्याची ठिकाणे माहित ठेवा.
-
आपल्या परिसरात ज्या आपत्ती होण्याची शक्यता आहे, त्यासाठीच्या DOs आणि DON’Ts शिका.
-
प्राथमिक उपचार, CPR व आपत्कालीन प्रतिसाद यांचे मूलभूत प्रशिक्षण घ्या.
पाणी शुद्धीकरण (Purifying Water)
-
जर पाण्याला वास येत असेल, रंग किंवा चव बदलली असेल किंवा पाण्यात कण दिसत असतील, तर त्वरित स्थानिक पाणीपुरवठा विभागास कळवा. असे पाणी वापरू नये.
-
मुख्य पाणीपुरवठा दूषित झाल्यास व पाणी कमी झाल्यास पाणी शुद्ध करूनच वापरावे.
-
पाण्यात कण असल्यास ते पेपर टॉवेलमधून गाळा, उकळा, पाण्याचे टॅब्लेट्स टाका किंवा निर्जंतुक करा.
-
पाणी शुद्ध करण्यासाठी सामान्यतः पाणी उकळणे आणि क्लोरीन टॅब्लेट्स वापरल्या जातात. परंतु अतिशय गंभीर आणि धोकादायक प्रमाणावर जल प्रदूषण आढळून आल्यास आधुनिक जलशुद्धीकरण यंत्रांचा वापर करावा.
-
तज्ञांचा सल्ला घेऊन घरगुती ब्लीचचा वापर निर्जंतुकीकरणासाठी करता येतो, मात्र अति प्रमाणत ब्लीचचा वापर धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक वापरा.
आपत्तीची पूर्वसूचना मिळाल्यावर काय करावे?
-
आपली औषधे, नाशवंत अन्नधान्य व पाण्यासह आपत्कालीन साहित्य जमा करा.
-
प्रत्येक व्यक्तीसाठी व पाळीव प्राण्यासाठी दररोज किमान ५ लिटर पाण्याचा साठा ठेवा.
-
किमान ३ दिवस पुरेल इतके अन्न व पाणी साठवून ठेवा. खराब हवामानामुळे पाणी/वीज सेवा खंडित होऊ शकते.
-
ज्यांना कमी शिजवावे लागते किंवा फ्रीज/पाणी लागणार नाही अशा अन्नपदार्थांचा साठा करून ठेवा. खूप तिखट किंवा खारट अन्न खाणे टाळा.
-
लहान मुले व कुटुंबातील इतर सदस्यांना काही अत्यावश्यक आहार लागत असेल तर त्याची आधीच तयारी करून ठेवा.
-
मोबाईल फोन चार्ज करून ठेवा. आपत्कालीन संपर्कासाठी SMS वापरा.
-
महत्वाचे कागदपत्रे (आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, आरोग्य/लसीकरण नोंदी इ.) गोळा करा व ओले होणार नाही असे सुरक्षित पिशवी अथवा पाकिटात ठेवा.
आपत्कालीन बॅग/किटमध्ये समाविष्ट मूलभूत वस्तू:
-
पिण्याचे हवाबंद व सुरक्षित पाणी
-
कोरडे व टिकाऊ अन्न (उदा. बिस्किट्स)
-
बॅटरीवर चालणारा टॉर्च व अतिरिक्त बॅटऱ्या
-
मेणबत्त्या व काडेपेटी/लाईटर (जलरोधक डबीत)
-
वैद्यकीय प्रथमोपचार साहित्य, गरजेची औषधे, फेस मास्क, सॅनिटायझर
-
डॉक्टरांनी दिलेली आवश्यक औषधांच्या पावत्या
-
क्लोरीन टॅब्लेट्स (पाणी शुद्धीकरणासाठी)
-
चाकू, कात्री, शिट्टी, डक्ट टेप, कागद व पेन, बॅटरीवर चालणारे रेडिओ
-
मोबाईल फोन, चार्जर, पॉवर बँक
-
प्राथमिक उपचार पुस्तिका/छायांकित प्रती
-
आपत्कालीन योजना, स्थानिक नकाशा, संपर्क क्रमांक, कुटुंबीयांची माहिती
-
महत्वाची कागदपत्रे, अतिरिक्त रोख पैसे/मूल्यवान वस्तू
-
वाहनाची व घराची अतिरिक्त चावी
-
चष्मा/इतर वैयक्तिक सहाय्यक वस्तू
-
साबण, सॅनिटरी नॅपकिन्स, वाईप्स, टॉयलेट पेपर, पेपर टॉवेल्स
-
जाड दोर व दोऱ्या
-
हवामानानुसार कोरडे कपडे, अंतर्वस्त्र, ब्लँकेट्स
-
सुरक्षित, टिकाऊ पादत्राणे
-
आपल्या भागातल्या संभाव्य आपत्तींनुसार इतर गरजेच्या वस्तू समाविष्ट करा.