उष्ण लहरी
सर्वसाधारणतः उष्ण लहरींच्या प्रभावादरम्यान-
काय करावे?
• हवामानाच्या योग्य आणि तात्काळ माहिती व बातम्यांसाठी रेडिओ ऐका, टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या अलर्ट आणि सूचनांकडे बारकाईने लक्ष द्या.
• हवामानाशी संबंधित अँप जसे कि ‘सचेत’ डाउनलोड करू शकता.
• उन्हाळाच्या दिवसांमध्ये तहान लागली नसली तरीही पुरेसे पाणी प्यावे.
• अपस्मार (Epilepsy) किंवा हृदय, मूत्रपिंड आणि यकृत संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींनी द्रव्य पदार्थांचे सेवन वाढविण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
• उन्हाळाच्या दिवसांमध्ये हलके, फिकट रंगाचे, सैल आणि सुती कपडे घालावे.
• घराबाहेर उन्हात असताना डोक्यावर कापड, रुमाल, टोपी किंवा छत्री चा वापर करा.
• उन्हाळयात घातक किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरू शकता.
• शक्य असल्यास डोळ्यांसाठी सनग्लासेस वापरा.
• उष्माघात झाल्यास काय केले पाहिजे यासंबंधीत प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घ्या.
• वृद्ध, मुले, आजारी किंवा जास्त वजन असलेल्या व्यक्ती उष्माघाताला जास्त बळी पडण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या.
• शक्य असल्यास दिवसाच्या अतिउष्म तासांमध्ये घरामध्येच रहा आणि कमीतकमी प्रवास करा.
• शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस (ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन), लस्सी, लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी इ यांसारख्या घरगुती पेयांचे सेवन करू शकता.
• कांद्याची कोशिंबीर, कच्चा आंबा, मीठ आणि जिरे यांसारख्या पारंपारिक पदार्थांचा आहारात समावेश केल्याने उष्माघाताचा प्रभाव कमी करण्यास मदत होऊ शकते.
• घर आणि कार्यालय परिसरात थंडावा आणि हवा खेळती राहण्यासाठी कूलर किंवा पंखे लावू शकता.
• उष्माघात टाळण्यासाठी वारंवार खूप थंड नसलेल्या साध्या पाण्याने आंघोळ करा.
• कार्यालय अथवा घरी येणारे विक्रेते, घरपोच वस्तू आणून देणाऱ्या लोकांना पाणी द्या.
• सार्वजनिक वाहतुकीची साधने वापरा आणि शक्य असेल तेव्हा खाजगी वाहने देखील सामूहिकपणे वापरू शकता. यामुळे जागतिक स्तरावर तापमानवाढ आणि उष्णता कमी होण्यास मदत होऊ शकते.
• आपल्या आजूबाजूला उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण करा. पावसाचे पाणी साठविण्यासाठी उपायोजना करू शकतो.
• ऊर्जेची बचत करणारी कार्यक्षम उपकरणे, स्वच्छ इंधन आणि पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर करू शकतो.
काय करू नये?
• दुपारच्या वेळी बाहेर असताना अति मेहनतीचे काम करणे टाळा.
• विना चप्पल बूट घालता अनवाणी बाहेर जाऊ नका.
• घरात स्वयंपाक करताना दिवसाचे तापमान जेव्हा जास्त असते तेव्हा स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक घरात हवा खेळती राहील यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. शक्य असल्यास उष्णता कमी करण्यासाठी एक्झॉस्ट पंखा बसवू शकतो.
• अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये यामुळे शरीरातून पाणी झपाट्याने कमी होते, त्यामुळे त्याचे सेवन टाळा.
• उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त प्रथिने, खारट, मसालेदार आणि तेलकट अन्नपदार्थ खाणे टाळा तसेच शिळे अन्न खाऊ नका.
• लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना वाहनांमध्ये एकटे सोडू नका.
• अनावश्यक उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांचा वापर करणे टाळा.
• झाडांचा पालापाचोळा, भुसा, पीक काढल्या नंतरचे शिल्लक काड्या आणि कचरा जाळू नका.